वन्यजीव रक्षण गरजेचे

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांचे प्रतिपादन
वन्यजीव रक्षण गरजेचे
File Photo

कंधाणे । वार्ताहर Kandhane-Baglan

वनपरिक्षेत्रात मानवाचा वावर वाढला असून होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळेच (Deforestation) वन्यजीवांचे (wildlife) अस्तित्व धोक्यात आले आहे. आश्रयासाठी वन्यजीवांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविल्यामुळेच त्यांच्यात व आपल्यात अस्तित्वासाठी संघर्ष उडत आहे.

हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांनी वन्यजीवांचे रक्षण (wildlife conservation) करून नैसर्गिक संपत्ती (natural resources) जतन करणे काळाची गरज असल्याचे मत सटाणा (satana) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी येथे बोलतांना केले. बागलाण तालुक्यात (baglan taluka) वनविभागातर्फे (forest department) सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहाचा समारोप वनपरिक्षेत्र कार्यालयात करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करतांना खैरनार बोलत होते.

तालुक्यात वनपरिक्षेत्र अंतर्गत वनविभाकडून 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहा (wildlife week) साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जे.एन. येडलावर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दहिंदुले, भावनगर, कोळीपाडा, केळझर, भवाडे, तताणी, दसाणे, विरगाव, ब्राम्हणगाव, कर्‍हे, कुपखेडा गावांसह नामपुर इंग्लिश मेडियम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना वन्यप्राणीबद्दल चित्रफिती दाखवून वन्यजीवांचे जीवनक्रम, बिबट्या, मानव संघर्ष, प्राण्यांचा वावर व राहणीमान याबाबत माहिती देण्यात आली.

वन्यप्राण्यांना बोलता येत नाही तेव्हा त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. नैसर्गिक जलस्रोत आटत चालले असल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांचे रक्षण झाले पाहिजे, असे आवाहन खैरनार यांनी केले. यावेळी विद्यार्थी व नागरिकांना वन्यजीवांचे रक्षण व जतन (wildlife conservation and conservation) करण्याबाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनरक्षक एन.एम. मोरे, व्ही.बी. हिरे, के.व्ही. मोहीते, डी.एम. देवकाते, एम.एस. वाघ, जि.डी. पवार, एस.एस. वाघ, सावंत यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.