शहरात विशेष अतिक्रमण मोहिमेची गरज

शहरात विशेष अतिक्रमण मोहिमेची गरज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) हद्दीत दिवसेंदिवस वाढणार्‍या अतिक्रमणाबाबत (encroachment) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.

कर वसुली विभाग (Tax Recovery Department) आणि अतिक्रमण विभागाच्या (Encroachment Department) कार्यपद्धतीवर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कर विभागाने वसुलीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली असली तरी अतिक्रमण विभागाकडून कारवाई का होत नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर आयुक्त डॉ. पुलकूंडवार यांनी शहरातील अतिक्रमणाला त्या त्या विभागांचे विभागीय अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

शहरातील अतिक्रमण (encroachment) तातडीने काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर शहरात काही ठिकाणी अतिक्रमण मोहिम (Encroachment campaign) राबविण्यात आली, परंतु नंतर ही मोहिम ठप्प झाली आहे. आयुक्तांनी विभाग प्रमुखांच्या घेतलेल्या एका बैठकीत कर वसुली आणि अतिक्रमण या विषयांवरून नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे कर विभागाने तातडीने पावले उचलून ढोल बजाव अभियानाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची वसुली केली आहे. परंतु अतिक्रमण विभागाकडून (Encroachment Department) कोणतीही कारवाई सध्या शहरात होतांना दिसत नसल्याने आता आयुक्त याबाबत कठोर भुमिका घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील महिन्यांत औरंगाबाद रोडवर (Aurangabad Road) झालेल्या अपघातानंतर (accident) शहरातील अपघातांना आळा घालण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आयुक्तांनी खास अपघात रोखण्यासाठी बैठक घेतली होती. मात्र शहरात वाढत असलेले अतिक्रमण (encroachment) या अपघातांना कारणीभुत ठरत असल्याचे दिसत आहे. शहरातील व उपनगरांमध्ये रस्त्यांवर असणारे विक्रेते, त्याबरोबर बेशिस्तपणे असणारे वाहनचालक असो अथवा रिक्षा चालक (Rickshaw driver) यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

सध्या शहरातील बर्‍याच रस्त्यांवर खोदकाम (road work) सुरु असलेल्या आधीच रस्ते वाहतुकीसाठी अरूंद झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या सिटीलिंकच्या (Citylink) मोठ्या बसेस याठिकाणाहून जात असल्याने रस्त्यावर वाहतुक ठप्प (traffic jam) होत आहे. शहरातील रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी कारंजा परिसर, निमाणी बस थांब्याचा परिसर, जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका याठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी असलेले अतिक्रमण काढणे क्रमप्राप्त झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com