आरोग्यासाठी विषमुक्त शेती गरजेची : मोगल

आरोग्यासाठी विषमुक्त शेती गरजेची : मोगल

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

रासायनिक खते (Chemical fertilizers), कीटकनाशके (Pesticides), तणनाशके यांचा शेतीसाठी अति वापर होत आहे. यामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून नवीन नवीन आजारांचा उदय होत आहे.

यासाठी विषमुक्त शेतीची (Toxin free farming) गरज निर्माण झाली असून सुरक्षित आरोग्यासाठी (health) शेतकर्‍यांनी (farmers) यापुढे जीवामृताचा वापर करून विषमुक्त शेती करावी असे आवाहन प्रयोगशील शेतकरी श्यामराव मोगल (Experimental farmer Shyamrao Mughal) यांनी केले आहे.

शिंगवे (shingve) येथे गोदावरी विद्यालयात (Godavari Vidyalaya) आयोजित विषमुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन करतांना मोगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर गीते (Vice President of the Institute of Education Bhaskar Geete) होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक जगन डेर्ले, बबन डेर्ले, सरपंच योगेश कटारे, उपसरपंच संजय डेर्ले, माजी उपसरपंच धोंडीराम रायते, शिक्षण संस्थेचे सरचिटणीस गोपाळ डेर्ले, प्रकाश अडसरे, मुख्याध्यापिका सुनीता पठाडे उपस्थित होत्या.

यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना (students) मार्गदर्शन करतांना मोगल म्हणाले की, विषयुक्त फळे, भाजीपाला, अन्नधान्य यामुळे माझ्या पत्नीला कॅन्सर आजार झाला व त्यातच तिचे निधन झाले. तेव्हापासून आपण विषमुक्त शेतीचा संकल्प केला.

गेल्या पाच-सात वर्षापासून द्राक्ष, कांदा, गहू, फळे यांचे केवळ जीवामृताचा वापर करून उत्पादन घेत असून सर्व पिकांना सर्वाधिक भाव मिळत आहे म्हणूनच सुरक्षित आरोग्यासाठी विषमुक्त शेती गरजेची असून शेतकर्‍यांनी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर थांबवून नैसर्गिक व सेंद्रीय शेतीची कास धरावी असे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापिका सुनीता पठाडे म्हणाल्या की, तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता पारंपारिक शेती करावी. नवीन तंत्रज्ञान यंत्राच्या सहाय्याने नैसर्गिक, सेंद्रिय शेती केल्यास प्रगती होवून आरोग्य उत्तम राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी धोंडीराम रायते यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक एन.एम. संगमनेरे यांनी तर सूत्रसंचालन ए.एस. पाटील यांनी केले.

याप्रसंगी एन.डी. गांगुर्डे, डी.बी. वडघुले, व्ही.एस. गांगुर्डे, एम.जी. गोसावी, बी.एस. शिंदे, एस.एस. कोंटूरवार, एस.के. जाधव, अनिता देशमुख, मोनिका डेर्ले, गोपाळ भडांगे, नारायण खरात, बापू मत्सागर आदींसह शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. एम.जी. गोसावी यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com