नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाणवेली काढण्यासाठी मशीनची आवश्यकता

जिल्हा नियोजन समितीने लक्ष देण्याची वन्यजीवप्रेमींकडून मागणी
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाणवेली काढण्यासाठी मशीनची आवश्यकता

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

निफाड तालुक्यातील (Niphad taluka) नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील (Nandurmadhyameshwar Sanctuary) गोदावरी पात्रात असलेल्या पाणवेलींमुळे (Water vines) नदीतील जीवसृष्टी धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून नदीपात्र या पाणवेलींनी वेढल्याचे चित्र आहे...

वन्यजीव विभागाला ही पाणवेली काढण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या मशनरीची आवश्यकता भासत आहे. याकडे जिल्हा नियोजन समितीने लक्ष घालावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. दरम्यान वन्यजिव विभाग यासंबंधी पत्रव्यवहार करण्याची चर्चा आहे.

नाशिक शहरात (Nashik City) गोदावरी नदीपात्रातील (Godavari river) पाणवेली काढ्ण्यासाठीचे मशीन उपलब्ध आहे, या मशीनची व्यवस्था नांदूरमध्यमेश्वरला झाली तरी ही पाणवेली काढली जाऊ शकते. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात शेकडो प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे.

नदीपात्रात विविध जीवसृष्टी आहे. मात्र पाण्यातील पाणवेलीचा फटका या जीवसृष्टीला बसण्याची भीती वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. दीड वर्षापूर्वीच या अभयारण्यास रामसरचा दर्जा मिळाला आहे. राज्यातील पहिलेच रामसार म्हणून हा बहूमान असल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यासाठी ही अभिमानाचीच बाब आहे.

पाणवेलीने सर्व पात्रच व्यापून टाकल्याने नदी पात्र मोकळे करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्यात दरवर्षी ही पाणवेली वाहून जाते, मात्र यंदा जूनमध्ये पाउस झाला नसल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग झाला नाही.

त्यामुळे ही पाणवेली नदीपात्रात तशीच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देउन पाणवेली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com