आयटीआय सिग्नल ते पपयाज नर्सरी दरम्यान उड्डाणपूलाची गरज

आयटीआय सिग्नल ते  पपयाज नर्सरी दरम्यान उड्डाणपूलाची गरज
USER

सातपूर | Satpur

नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांची भेट घेवून त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील (Trimbakeshwer Road) वाहतूकीची गर्दी व भविष्यातील वाढणारा तार लक्षात घेऊन येथे उड्डाण पूल उभारण्यासाठी साकडे घातले. यावर हा विषय तातडीने मार्गी लावणार असल्याच नितीन गडकरी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे....

नाशिकमधील (Nashik) औद्योगिक क्षेत्र (Industrial area) गेल्या अनेक वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या औद्योगिक विकासासह कामगार वसाहती वेगाने वाढल्या आहेत.

कामगार वसाहतीमध्ये काम करणारे कर्मचारी, उद्योजक तसेच उद्योगांचा कच्चा-पक्का माल वाहतूक करणारी वाहने यांचा २४ तास या महामार्गावर राबता असतो. या सोबतच देशभरातून भाविक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या आजच निर्माण होत आहे. येत्या दहा ते पंधरा वर्षात हा प्रश्न गंभीर होणार आहे.

त्यामुळे आयटीआय सिग्नल ते पप्पया नर्सरी दरम्यान होणारी वाहतूकीची कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची सातपूर गावातील (Satpur Area) नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून जाणार्‍या त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय सिग्नल (ITI Signal) ते पप्पया नर्सरी दरम्यान उड्डाणपूल (Flyover) बांधण्यास आपण मंजुरी द्यावी आणि उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीे.

या मागणीबाबत नितीन गडकरी यांनी विभागाद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले असून त्याची गरज व रस्त्याची स्थिती याबद्दल त्यांनी सकारात्मकता दाखवली असून या कामास तत्व:ता मान्यता देत असल्याचे सांगून लवकरच कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com