रेल्वेच्या सेवकांना नेकबँड पीए सिस्टम

सुरुवातीला ५० संच खरेदी
रेल्वेच्या सेवकांना नेकबँड पीए सिस्टम

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनाचा धोका ओळखून मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस (पीए) प्रणाली दिली आहे. सुरुवातीला असे ५० संच खरेदी केले गेले असून येत्या काही दिवसांत अन्य तिकिट तपासणी सेवकांनाही ते देण्यात येतील.

यामुळे प्रवाशांशी संवाद साधण्यास सोपे होईल. सामाजिक अंतर पालनासाठी तिकीट तपासणीसांना दिलेल्या सूचना ते व्यवस्थित ऐकू शकतील. प्रवासी जेव्हा येतात तेव्हा नियमन करण्यास देखील हे उपयुक्त ठरेल. या पोर्टेबल पीए सिस्टमची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

बारा वॅटच्या जास्तीत जास्त आवाजाच्या आउटपुटसह कॉम्पॅक्ट अल्ट्रा पोर्टेबल पीए एम्पलीफायर आहे. हेडबँड मायक्रोफोनला जोडण्यासाठी ३.५ मिमी मायक्रोफोन इनपुट सॉकेट आणि डीव्हीडी, सीडी किंवा एमपी ३ ला जोडण्यासाठी ३.५ मिमी लाइन इनपुट सॉकेट आहे.

Related Stories

No stories found.