संविधान वाचविण्यासाठी एकत्र येणे आवश्यक : पटोले

संविधान वाचविण्यासाठी एकत्र येणे आवश्यक : पटोले

नाशिक | Nashik

देशात सर्वत्र संविधानाने (Constitution) दिलेल्या अधिकार हिसकावून घेण्याचे काम सुरू आहे. सध्या समाजाच्या प्रमुख लोकांसह चर्चा करून हे मंथन करण्याचे काम सुरू असून संविधान वाचविण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी तसेच ओबोसीनी (OBC) एकत्र येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे..

आज शहरातील धनलक्ष्मी लॉन्स येथे कॉंग्रेसचे मंथन शिबीर (Churning Camp) आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,देशाला काँग्रेसने (Congress) स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देश उभा करणे हा मोठा प्रश्न काँग्रेसने सोडवला. जाती धर्मातील विखुरलेला देश काँग्रेसने एकत्र संघटित केला. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संपूर्ण देशात फक्त ५० गावांमध्ये वीज होती. तेव्हापासून आतापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये विकास करण्याचे काम काँग्रेसने केले असे पटोले यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, देशात हरित क्रांती (Green Revolution) इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) आणली. उत्तर महाराष्ट्रात जी क्रांती झाली ती काँग्रेसने केली. केंद्रात आता दुष्टांचे सरकार आले असून त्यांनी शेतकऱ्यांविरोधात तीन कायदे केले. त्यामुळे संपूर्ण देशात मोठे आंदोलन झाले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लाखो शेतकरी आंदोलनाला बसले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हटल्याचे पटोलेंनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, नाशकात कांदा (Onion) मोठ्या प्रमाणात पिकतो. परंतु या कांद्याचा भाव काय आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही. शेतकऱ्यांचे काही नाही त्यांना बरबाद करण्याचे कारनामे सुरू झाले आहेत. तसेच नाशिक (Nashik)हे धर्माचे आणि क्रांतीचे स्थान असून उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण असल्याने अन्यायाविरुध्द लढण्याची ताकद या जिल्ह्यात असल्याचे पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com