‘एनडीएसटी’ पतसंस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग

नाशिक, मालेगाव, सटाणा, दिंडोरीत सर्वाधिक मतदार
‘एनडीएसटी’ पतसंस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वात मोठी पतसंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी (Nashik District Secondary Teachers and Non-Teaching Employees Credit Society)अर्थात ‘एनडीएसटी’ पतसंस्थेच्या पंंचवार्षिक निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत सुमारे 1681 मतदार कमी झाले आहेत.

सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक शहरासह मालेगाव, सटाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये उमेदवारीची चुरस निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने आता इच्छुकांनी चाचपणी सुरू केल्यामुळे निवडणुकीत रंग भरले जात आहेत.जिल्ह्यातील शिक्षकांना कर्जपुरवठा करणार्‍या एनडीएसटी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

जिल्हा सहनिबंधक कार्यालयाने पतसंस्थेची मतदारांची माहिती मागवली होती. त्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तब्बल 1681 मतदारांची घट झाली आहे.मागील निवडणुकीच्या वेळी साधारणत: 11 हजार 700 मतदारांची नावे यादीत होती. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांच्या कार्यकाळात बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर सेवक निवृत्त झाले. त्यांची नावे या मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच नवमतदारांची नोंदणी करताना गट-तटाचे राजकारण आडवे आले आहे.

तसेच पतसंस्थेचा कारभार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरल्याने शिक्षकांनी यापासून स्वत:ला दुर ठेवणेचेही पसंत केले आहे. शिवाय मविप्र समाज शिक्षण संस्था, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था व महात्मा गांधी विद्या मंदिर याशिक्षण संस्थांच्या स्वत:च्या पतसंस्था आहेत. त्यामुळे येथील शिक्षक व शिक्षकेतर सेवक या निवडणुकांमध्ये फारसा सहभाग घेत नाहीत. त्यांना बंदी घालण्यात आलेली नाही. परंतु, शिक्षक या वादापासून स्वत:ला दुर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने एनडीएसटी सोसायटीचे मतदार घटल्याचे सांगितले जाते.

मतदारांचे मेळावे सुरू

निवडणूक समीप आल्याने आता इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरु केली आहे. त्यादृष्टीने मतदारांचे मेळावे घेतले जात आहेत. या निवडणुकीत साधारणत: तीन पॅनल निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.