
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिक्षकांची (Teachers) सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स अॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी (Nashik District Secondary Teachers and Non-Teaching Employees Credit Society) अर्थात ‘एनडीएसटी’ (NDST) पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.20) अंतिम मुदत आहे...
त्यामुळे पॅनलमधील उमेदवार ठरवताना नेत्यांची चांगलाच कस लागत आहे. 21 जागांकरिता 107 इच्छुकांचे अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत (Election) यंदा चुरस निर्माण हिणार असे चित्र आहे.
इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणत्या उमेदवाराला पॅनलमध्ये स्थान द्यावे,यावरुन पॅनलच्या नेत्यांचा चांगलाच कस लागत असून डोकेदुखी वाढली आहे. 14 जूनपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून पॅनलच्या उमेदवारांची यादी अंतिम झालेली नाही. इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांची कसब पणाला लागले आहे.
सत्ताधारी गटाकडून मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर विरोधी गटातून पॅनलचे नेते आर. डी. निकम यांची पत्नी सिमा निकम-देवरे, एस.बी. देशमुख, सविता देशमुख, नीलेश ठाकूर आदींचे अर्ज दाखल झाले आहेत.
एकूण 21 जागा असल्या तरी दोन्ही पॅनलचे मिळून साधारणत: 10 ते 15 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी अखेरचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.
तर मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 6 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत असल्याने त्यानंतरच खर्या अर्थाने पॅनलची घोषणा करण्याचा निर्णय दोन्ही पॅनलने घेतलेला दिसतो. शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील.
निवडणूक कार्यक्रम
दि.२१ जून २०२२ : उमेदवारी अर्जाची छाननी
दि.२२ जून २०२२ : वैध नामनिर्देशन पत्रे प्रसिद्ध
दि.२२ जून ते ६ जुलै २०२२ : उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत
दि.७ जुलै २०२२ : उमेदवारांना निशाणी वाटप
दि. १७ जुलै २०२२ : मतदान
दि. १८ जुलै २०२२ : मतमोजणी व निकाल