एनडीएसटी निवडणूक : टीडीएफच्या 'प्रगती' आणि 'परिवर्तन' पॅनलमध्ये सरळ लढत

एनडीएसटी निवडणूक : टीडीएफच्या 'प्रगती' आणि 'परिवर्तन' पॅनलमध्ये सरळ लढत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी (NDST) पतसंस्थेच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. पतसंस्थेच्या 21 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात उतरले आहेत...

दि. 17 जुलै रोजी मतदान (Voting) होणार आहे. अखेरच्या दिवसापर्यंत 66 इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. आता खऱ्या निवडणुकीतील (Election) चुरस वाढणार आहे.

पतसंस्थेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननीनंतर 121 इच्छुकांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरु झाली. माघारीच्या अखेरच्या दिवशी (दि.६) तब्बल 56 इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे एकूण माघारीचा आकडा 66 पर्यंत पोहोचला.

माघारीची मुदत संपताच सत्ताधारी गटासह विरोधी गटाने पॅनलची घोषणा केली. एनडीएसटी विकास समिती पुरस्कृत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे (Dr. Apurv Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार घोषित झाले. यावेळी पॅनेलचे नेते शाम पाटील, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, डी. यू. अहिरे, पुरुषोत्तम रकीबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, प्रमोद पाटील उपस्थित होते.

सत्ताधारी गटातर्फे टीडीएफ-प्रगती पॅनलची घोषणा माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, गोरख सोनवणे, मधुकर भदाणे, सुरेश शेलार, नानासाहेब देवरे, रवींद्र मोरे, रवींद्र जोशी, टी. एम. डोंगरे, ई. के. कांगणे यांनी केली.

दोन्ही पॅनलची घोषणा झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांनी आपल्या पध्दतीने तिसरा पॅनल तयार करुन या दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

असे आहेत पॅनलचे उमेदवार

परिवर्तन पॅनल

 • नाशिक सर्वसाधारण : संग्राम करंजकर, संजय पाटील, सचिन सूर्यवंशी.

 • त्र्यंबकेश्वर-पेठ : शुभागिनी पवार.

 • दिंडोरी : लोकेश पाटील.

 • सटाणा : सचिन शेवाळे.

 • कळवण- सुरगाणा-देवळा - बी. एन. देवरे, जी. टी. पगार.

 • मालेगाव : संजय मगर, प्रकाश भदाणे.

 • चांदवड: सचिन पाटील.

 • नांदगाव : बाळासाहेब भोसले.

 • येवला : बाळासाहेब मोरे.

 • निफाड : शंकर सांगळे.

 • सिन्नर : दत्ता वाघे पाटील.

 • इगतपुरी : प्रशांत आहेर.

 • महिला : अरुणा खैरनार, सविता देशमुख.

 • अनु जाती. जमाती: उत्तम झिरवाळ.

 • एनटी : गोरख कुनगर.

 • ओबीसी : राजेंद्र लोंढे.

टीडीएफ प्रगती पॅनल

 • नाशिक सर्वसाधारण : निंबा कापडणीस, सचिन पगार, चंद्रशेखर सावंत.

 • त्र्यंबकेश्वर- पेठ : दीपक ह्याळीज.

 • दिंडोरी : विलास जाधव.

 • सटाणा : संजय देसले.

 • कळवण- सुरगाणा-देवळा - संजय पाटील, शांताराम देवरे.

 • मालेगाव : संजय वाघ, मंगेश सूर्यवंशी.

 • चांदवड: ज्ञानेश्वर ठाकरे.

 • नांदगाव : अरुण पवार.

 • येवला : गंगाधर पवार.

 • निफाड : समीर जाधव.

 • सिन्नर : दत्तात्रय आदिक.

 • इगतपुरी : बाळासाहेब ढोबळे.

 • महिला : भारती पाटील, विजया पाटील.

 • अनु जाती, जमाती : अशोक बागूल.

 • एनटी : मोहन चकोर.

 • ओबीसी : अनिल देवरेे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com