जिल्हा बँक सुस्थितीत येईपर्यंत निवडणूक घेऊ नये

नाशिक डिस्ट्रिक्ट को.ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनची मागणी
जिल्हा बँक सुस्थितीत येईपर्यंत निवडणूक घेऊ नये

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (Nashik District Central Cooperative Bank) वाढलेला एनपीए तसेच बँकेची विस्कटलेली आर्थिक घडी, बँकेवर (Bank) सेक्शन ११ ची आलेली नामुष्की, बँकेला रिझर्व बँकेद्वारे असलेली विहीत भाग भांडवल पर्याप्तता पुर्ण करण्यासाठी येणा-या अडीअडचणी, ठेवीदारांना बँकेकडून ठेवी परत मिळवण्यासाठी येणा-या अडचणी, बँक सेवकांना येणा-या अडीअडचणी या सर्व कारणांचा विचार करुन बँक सुस्थितीत येईपर्यंत बँकेत सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया (Election Process) थांबविण्यात यावी,अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट को.ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष रतन जाधव, सरचिटणीस प्रदिप शेवाळे यांनी मुख्यमंत्री व सहकारमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे....

या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नोटबंदीपासून (Demonetisation) प्रचंड प्रमाणात अडचणीत आलेली आहे.बँकेच्या ठेवीदारांना बँक रोख स्वरुपात दरमहा रक्कम पाच हजार रुपयेही देऊ शकत नाही. तसेच बँकेचा एनपीए (NPA) १३४२८६.४३ लाख इतका वाढलेला असून बँकेवर सेक्शन ११ ची टांगती तलवार गेल्या ४ वर्षांपासून आहे. बँकेवर शासनाने गेल्या २ वर्षांपासून प्रशासक नेमलेले आहेत. तसेच बँकेचे लायसन्स अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत शासनाने प्रतापसिंह चव्हाण यांची बँकेच्या प्रशासकपदी फेब्रुवारी २०२३ पासून नेमणूक केली आहे.

चव्हाण यांची नेमणूक झाल्यापासून ते आजपर्यंतचे ३ महिन्याच्या कालावधीत बँकेच्या थकीत कर्ज वसुलीसाठी प्रशासकांनी चांगले पयत्न सुरु केले असून, बँकेचे भाग भांडवलात देखील चांगली वाढ केली आहे.त्यामुळे प्रशासकीय नेमणूक नाशिक जिल्हा मध्य. सह. बँक सुस्थितीत येईपर्यंत कायम ठेवावी व नाशिक जिल्हा बँकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा चांगल्या रीतीने सुरु होण्यासाठी जिल्हाभरातील सर्व सामान्य शेतकरी व ग्राहकवर्ग यांच्या सर्व अडीअडचणी दूर होण्यासाठी बँकेस सहाय्य करावे,असेही निवेदनात म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com