सत्तेसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना आतापासून

सत्तेसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना आतापासून

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाच्या नगरसेवकांची Corporators सध्या संख्या जरी कमी असली तरी मनपामध्ये NMC सत्ताधारी होण्यासाठी व जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आतापासूनच सुरू होत असल्याचे चित्र सध्या पक्षामध्ये दिसून येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला NMC Upcoming Elections बराच अवधी शिल्लक असतानाच सुमारे दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुमारे 500 हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अगोदरच घेतल्या गेल्या.

सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन नाशिकमध्ये एक, पूर्वमध्ये चार, नाशिकरोड विभागात एक तर स्वीकृत एक नगरसेवक असे एकूण सात नगरसेवक आहेत. तर पंचवटी व सातपूर परिसरामध्ये एकही नगरसेवक निवडून आणण्यात पक्षाला यश आले नव्हते. एकंदरीत ही संख्या बघता नाशिक शहराचे पालकमंत्री छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळाच्या आरोपाखाली तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अल्प नगरसेवक संख्येमध्ये समाधान मानावे लागले होते.

मात्र आता पालकमंत्री भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने यंदाच्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भुजबळ आपले बळ वापरणार हे भुजबळ फार्मवरील वाढत्या गर्दीमुळे दिसून येत आहे. सध्या पक्षाच्या दिग्गज पदाधिकार्‍यांना विधानसभा मतदारसंघानुसार जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले आहे तर त्यात या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, याचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पश्चिम मतदारसंघातून शहराध्यक्ष रंजन ठाकरे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पूर्व मतदारसंघात रंजन ठाकरे हे स्वतः नेतृत्व करणार आहेत.

मध्य मतदारसंघात रंजन ठाकरे यांचे समवेत विद्यमान नगरसेवक गजानन शेलार तर देवळाली मतदारसंघात विद्यमान आमदार सरोज आहेर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. सध्या विविध नागरी समस्यांसाठी तसेच विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे विविध आंदोलन पक्षातर्फे सुरू आहेत.

करोनाच्या महामारीत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली. तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ नॉलेज सिटी येथे कोविड सेंटर उभारले होते त्याचा परिणाम मतदानावर होतो का ? हे तर येणारी वेळ ठरवेल. मात्र माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह भुजबळ फार्मवरील बिरबल म्हणून ओळख असलेले तसेच भुजबळ परिवाराचे निकटवर्तीय दिलीप खैरे हे महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com