राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उर्जामंत्री डॉ. राऊत यांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उर्जामंत्री डॉ. राऊत यांना निवेदन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

एकलहरे वीज प्रकल्पाचे नूतनीकरण (Renovation of Ekalhare Power Project )व्हावे अथवा 250 मेगावाटचे दोन संच देण्यात यावेत यासाठी उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut )यांना अखिल भारतीय समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( NCP)निवेदन देण्यात आले.

मंत्री राऊत एकलहरे दौर्‍यावर आले असता समता परिषदेचे अध्यक्ष शानु निकम व पदाधिकार्‍यांनी हे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मंत्री राऊत यांनी दिले.

निवेदनाचा आशय असा की, एकलहरे प्रकल्पासाठी रस्ते, पाणी, रेल्वे, जमीन, मनुष्यबळ उपलब्ध आहे. तरीही प्रकल्पाकडे शासन दुर्लक्ष करत आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी हा विज प्रकल्प व्हावा यासाठी अनेकदा आंदोलन केले. प्रकल्प लवकर झाल्यास परिसराचा विकास होऊन बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.

Related Stories

No stories found.