नाशिक | Nashik

सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता ’मिशन प्रभाग’ मोहीम सुरू केली असून शहराध्यक्ष रंजन ठाकरे आता शहरातील सहाही विभागांमधील 31 प्रभागांमध्ये रंजन ठाकरे यांनी प्रभाग निहाय दौर्याचे वेळापत्रक जाहीर करुन प्रत्यक्ष फिरून नेमकी परिस्थिती काय ? सत्ताधारी भाजपा विरोधात कशा पद्धतीने असंतोष आहे तसेच राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार कोण? याचा शोध घेणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दंड थोपटले असून मध्यंतरी माजी खासदार समीर भुजबळ व ठाकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेत निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र घडेल असे चित्र असले तरी प्रत्यक्षात अखेरच्या क्षणापर्यंत नेमके काय होईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही.

या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आता मिशन प्रभाग मोहीम सुरू केली असून प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन ते स्थानिक पदाधिकारी, नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा अंदाज घेणार आहे. त्याची सुरुवात आज 23 डिसेंबर बुधवारपासून झाली. पहिल्या दिवशी सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 व 29 येथे सायंकाळी 6 वाजता त्यांनी बैठक घेतली.

असा आहे दौरा

दि.24 डिसेंबर रोजी सातपूर मधील प्रभाग 10 व 11, दि.25 डिसेंबर रोजी पश्चिम मधील प्रभाग 7 व 12, 13, दि.26 डिसेंबर रोजी पंचवटी मधील प्रभाग 2 व 3, 5 दि.27 डिसेंबर रोजी नाशिक पूर्व विभागातील प्रभाग 14 23 व 30 दि.28 डिसेंबर रोजी नाशिक रोड भागातील प्रभाग 17 , 20 व 21, दि.29 डिसेंबर रोजी सिडकोतील प्रभाग 25 27 व 31 , दि.30 डिसेंबर रोजी नाशिकरोड मधील प्रभाग 18 19 व 22,दि.31 डिसेंबर रोजी नाशिक पूर्व मधील 15 व 16, दि.1 जानेवारी रोजी प्रभाग 1,4 व 6 तर दि.2 जानेवारी रोजी प्रभाग 8,9 आणि 26 या ठिकाणी बैठका होणार आहेत.