इंधन दरवाढीविरोधात उद्या राष्ट्रवादीचा 'बैलगाडी मोर्चा'

इंधन दरवाढीविरोधात उद्या राष्ट्रवादीचा 'बैलगाडी मोर्चा'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत (Gas, Petrol and Diesel Price Hike). केंद्र सरकारने (Central Government) ही दरवाढ कमी करावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने (Nashik District NCP) जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार (Ravindra Pagar) यांच्या नेतृत्वाने उद्या बैलगाडी मोर्चा (Agitation) काढण्यात येणार आहे....

उद्या (दि.९) सकाळी १० वाजता सटाणा बस स्थानकापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार संजय चव्हाण (Sanjay Chavhan), राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी (Shailesh Suryavanshi) व सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे (Rajendra Sonawane) यांनी दिली आहे.

मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, महिलाध्यक्षा रेखा शिंदे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, शहराध्यक्ष सागर वाघ आदींनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com