तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP Youth) शहराध्यक्ष अंबादास खैरे (City President Ambadas Khaire) यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यानी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात तुषार भोसलेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली....

शरद पवार यांच्याविरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टिका सोशल मिडीयावर केली. भोसले यांनी केलेली टिका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरण हाताळत असलेले अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो मधील अधिकारी समीर वानखेडे हे यांच्या विरोधारातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमासमोर आणल्यानंतर भाजपाला या प्रकरणात आगपाखड होण्याचे कारण नसताना केवळ विरोधाला विरोध करत आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात अंबादास खैरे, सातपूर पोलीस ठाण्यात बाळा निगळ, इंदिरानगर पोलीस ठाण्यात जय कोतवाल, गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश पवार, आडगाव पोलीस ठाण्यात संतोष जगताप, सिडको पोलीस ठाण्यात विशाल डोके, भद्रकाली पोलीस ठाण्यात सागर बेदरकर, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गणेश खोडे,

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सोनू वायकर, म्हसरूळ पोलीस ठाण्यात महेश शेळके, उपनगर पोलीस ठाण्यात राहुल तुपे याठिकाणच्या पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुषार भोसलेवर गुन्हा दाखल करावा तसेच जाहीर माफी मागण्याबाबतचे निवेदन दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com