छगन भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करावी; युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नाशिक | Nashik

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) हे अति महत्वाचे राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षेत वाढ (increase security) करावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे...

या पत्रात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून इतर व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच महाविकास आघाडीतील नेत्यांपैकी भुजबळ हेही महत्वाचे नेते आहेत.

भुजबळ हे अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असून ओबीसी नेते (OBC leaders) असल्याने बहुजन समाजाच्या न्यायहाक्कासाठी नेहमी लढा देत असतात. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांचा देशभर वावर असतो. त्यांनी सन २००२ ते २००३ या कालावधीत राज्याचे गृहमंत्री असताना विविध गँगच्या हस्तकांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता.

भुजबळ हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील काम करतात. याठिकाणी सुद्धा त्यांना धोका असतो. विविध सनातनी संघटनांकडून त्यांना मारण्याच्या धमक्या वेळोवेळी मिळत असतात.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यकर्ते भुजबळ यांच्या विरोधात नेहमी आंदोलने करतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला विविध सनातनी प्रवृतींपासून असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा पूर्वीप्रमाणे करण्यात यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com