Nashik News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात आंदोलन

Nashik News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सरकारने (State Government) कंत्राटी पद्धतीने (Contractually) काढलेल्या नोकरभरतीचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून (शरद पवार गट) राज्यभरात आंदोलन (Agitation) करत निषेध करण्यात येत आहे. मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी भवनाबाहेर फलक हातात घेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करत आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) देखील नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून (Nashik City Nationalist Youth Congress) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले...

Nashik News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात आंदोलन
Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट झाले मालामाल; दोन महिन्यात मिळाले 'इतक्या' कोटींचे उत्पन्न

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या शासन आदेशाची (जीआर) होळी केली. तसेच भाजपा हटावा, नोकऱ्या वाचवा, कंत्राटी मुख्यमंत्री भरा पण नोकऱ्या परंमनंट करा, कंत्राटी सरकार हाय हाय, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, रद्द करा रद्द करा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा, रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा, अशा आशयाचे फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात घेत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

Nashik News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात आंदोलन
Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर

दरम्यान, आंदोलनानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात आंदोलन
Nashik Accident News : कार-कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com