पतंग उडविणाऱ्यांनो सावधान! नायलॉन मांजावर पथकांची करडी नजर

नायलॉन मांजा
नायलॉन मांजा

नाशिक | Nashik

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (NCP youth city president ambadas khaire) यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे....

पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या (Nylon Manja) वापरामुळे अनेक अपघात होवून नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहीना तर आपला जीव देखील गमवावा लागतो. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच (Supreme Court) बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे.

याचे दुष्परिणाम सामान्य माणासांप्रमाणेच पशुपक्षांनाही भोगावे लागत आहेत. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांना देखील याचा मोठा त्रास होतो अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राण देखील जातात. बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते परंतु छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होते.

या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नायलॉन मांजा विकताना पथकातील पदाधिकाऱ्यांना सापडल्यास पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com