नाशिक | प्रतिनिधी

वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल, हिटलर शाही नही चलेगी या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे भारतामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत असून कोरोनाचे फक्त निमित्त झाले आहे. केंद्र सरकारच्या शून्य नियोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत असून गेल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (GDP) निच्चांक पातळी गाठली आहे.

केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे व वायफळ खर्चामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याअगोदरच ही परिस्थिती उद्भवली असून कोरोना महामारीचे निमित्त झाले आहे. इंधन दराची घौडदौड सुरूच असून घरगुती गॅसचे दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वोत्तम पातळी गाठली आहे.

दिवसागणित इंधन दरवाढ होत असून त्याचबरोबर महागाईत वाढ होत आहे. लॉकडाउनच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरू असून इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल दराची 'सेंच्युरी' पूर्ण होईल.

इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचे तंत्र केंद्र सरकारने विकसित केले आहे. लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असतांना देखील भारतात इंधनाचे दर वाढत होते.

कोरोना महामारीत अनेकांचे रोजगार बुडाले असून वाढत्या महागाईमुळे त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. केंद्र सरकारच्या सुलतानी वृत्तीमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी कधी नव्हे ते आंदोलन करत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून कडधान्य व डाळींसह भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या असून गृहिणींना घर चालविणे मुश्कील झाले आहे.

महागाईचा बाकासूर जाळण्यासाठी अर्थतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पेट्रोल व डीझेलवरील सेस कमी करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, चेतन कासव, प्रफुल्ल पवार, बाळा निगळ, शामराव हिरे, जय कोतवाल, गणेश गायधनी, कृष्णा काळे, किरण भुसारे, रामदास मेदगे, राकेश पानपाटील, विशाल डोखे, महेश शेळके, सागर बेदरकर, अक्षय कहांडळ, निलेंश भंदुरे, छबूमामा मटाले, संतोष जगताप, आकाश पिंगळे,

राहुल कमानकर, संदीप भैरे, संदीप गांगुर्डे, रामेश्वर मोगल, नवराज रामराजे, योगेश ढुबे, विक्रांत डहाळे, संदेश भागवत, हर्षल चव्हाण, अक्षय पाटील, संदीप खैरे, सुनिल घुगे, करण आरोटे, सम्राट गायकवाड, गणेश खोडे, तुषार दिवे, सोनू कागडा,

मिलिंद सोळंकी, प्रतिक याळूरकर, प्रशांत अहिरे, अभिषेक अहिरे, ऋषिकेश पाटील, प्रसाद पवार, शाहाबाद शेख, प्रशांत नवले, चेतन परव आदींसह मोठ्या संख्येने जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.