अब की बार महंगाई की मार; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवकचे ढोल बजाओ

अब की बार महंगाई की मार; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवकचे ढोल बजाओ

माडसांगवी | वार्ताहर | Madsangvi

दिवसेंदिवस इंधन दरवाढ (Fuel Price Hike) होऊन सामान्य नागरिकांची आर्थिक घडी विसकटत चालली आहे. याबाबत केंद्र सरकारला (Central Government) जागे करण्यासाठी इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने (NCP Youth) ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले...

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या केलेल्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्याचा निषेध म्हणून नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लाखलगाव येथील पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष गणेश गायधनी (Ganesh Gaidhani) यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन केले.

यावेळी अब की बार महंगाई की मार, मोदी मतलब महंगाई, वारे मोदी तेरा खेल, सोने के दाम मे मिलता तेल, अशा घोषणांनी देण्यात आल्या. तसेच पेट्रोल पंपाला पुष्पहार घालण्यात आला

मोदी सरकारने (Modi Government) केवळ सर्वसामन्य जनतेकडून बेसुमार वसुली सुरु करुन महागाईचा भडका केला. आज महागाई सणासुदीत गगनाला भिडली आहे गॅस,पेट्रोल व डिझेल दर वाढीने सर्वसामान्याचे कबंरडे मोडले आहे. अशा शब्दात केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी निषेध करत ढोल वाजवला.

केंद्रांने गरीब जनतेची दिवाळी गोड करावी, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात तळागाळापर्यंत निषेध मोर्चे काढून मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक कांडेकर, तालुका उपाध्यक्ष भास्कर ढिकले, जिल्हा सरचिटणीस अक्षय कहांडळ, विधानसभा अध्यक्ष तुषार खांडबहाले, विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश टिळे, तुषार निरगुडे, गोकूळ कांडेकर, निखिल भागवत, अनिल पेखळे, अक्षय अनवट, संदीप जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.