करोनाचे झाले थोडे; महागाईने मोडले कंबरडे

राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांचे घरातून आंदोलन
करोनाचे झाले थोडे;  महागाईने मोडले कंबरडे

दे. कॅम्प । वार्ताहर

करोनाचा प्रंचड उद्रेक असतांना या महामारीत केंद्र सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधून महागाई नियंत्रणात आणण्याचे ढोंग करत आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ सुरुच ठेवली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

महागाईमुळे सर्वसामान्यांसह नोकरवर्ग, हॉटेल व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यात गृहिणी मात्र चहुबाजूंनी होरपळली गेली आहे. त्यांचे मासिक बचतीचे बजेट कोलमडले आहे. तर हातावर पोट असणारा आधीच हाताला काम नसल्याने बेजार झाला आहे.

नोकरवर्गाचे पगार कमी झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार सातत्याने महागाईत वाढ करून जनतेला रस्त्यावर आणू पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी संदर्भात जाहीर निषेध करत बलकवडे यांनी महागाई विरोधात फलक बनवून गॅस सिलेंडरसह घरीच आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाची सोशल मिडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com