नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने सातत्याने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतील गटनेत्या खा.सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निषेध करून निवेदन देण्यात आले.

(दि. ०१) डिसेंबरपासून ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या अनुदानित, व्यावसायिक दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे.

यामुळे सर्व सामान्य कुटुंबातील महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अवघ्या एका महिन्यात दोन वेळा किंमतीत भरमसाठ वाढ केलेली आहे. सद्यस्थितीत घरगुती सिलिंडरची किंमत पुढीलप्रमाणे आहे.

दिल्ली-६९४ रूपये, मुंबई- ६९४ रूपये, कलकत्ता-७२० रूपये, चेन्नई- ७१० रूपये व्यावसायिक सिलिंडर-दिल्ली-१३३२.५० रूपये, मुंबई- १२८०.५० रूपये, कलकत्ता-१३८७.५० रुपये, चेन्नई- १४४६.५० रूपये.

याशिवाय ५ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत १८ रूपये वाढ झालेली आहे. उपस्थित महिलांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. केंद्र सरकारने दखल घेऊन सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात व सर्व सामान्य कुटुंबांचा विचार करावा. अन्यथा यापुढे महिला रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.

यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहर पदाधिकाऱ्यानी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन गॅस दरवाढीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गॅस दरवाढ मागे घ्यावी, असे निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, रंजना गांगुर्डे, विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, संगिता गांगुर्डे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सुजाता कोल्हे, संगिता भामरे, सुजाता गाढवे, योगिता आहेर, सुनिता थिगळे, स्वाती बिडला, मनिषा पवार, दिक्षा दोंदे, मंगला मानकर, सलमा शेख, शकिला शेख, संगिता चौधरी आदी महिला उपस्थित होत्या.