पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

पेठ | प्रतिनिधी | Peth

तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे (Gram Panchayat Elections)बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली होती. मात्र सर्वांनीच एकला चलोराचा मार्ग स्विकारल्याने आघाडी अथवा युती झाली नाही. त्यामुळे शिवसेना (Shivsena)राष्ट्रवादी (NCP)कॉंग्रेस (Congress) माकप (Communist Party) भाजप (BJP) यांनी मोर्चेबांधणी करूनही अनेकांनी अपक्ष (independent)म्हणून निवडणूक लढविल्याने यश मिळाले आहे...

थेट सरपंचपदासाठीच्या (Sarpanch Post)एकूण ७१ जागांपैकी अंध्रुटे येथील सुरेखा जनार्दन आवारी व नाचलोंढी येथील हिरा सुभाष चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याने ६९ जागांसाठीच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादीने (NCP)बाजी मारल्याचे दिसून येते.

लक्षवेधी लढती

कुंभाळे ग्रामपंचायतीत (Kumbhale Gram Panchayat) सेनेचे कट्टर समर्थक असणारे मोहन कामडी व जगदीश गावित या दोन्ही समर्थकांमध्ये कडवी झुंज होऊन यात मोहन कामडी यांनी बाजी मारली. तर कोटंबी ग्रामपंचायतीत (Kotambi Gram Panchayat) मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत व शिवसेनेचे किरण भुसारे यांच्या सत्तासंघर्षात अनुभवी राऊत यांना पराभव स्विकारावा लागला .

तर कोपूर्ली (बु) ग्रामपंचायतीत (Kopurli Gram Panchayat) माजी पं. स. सभापती विठाबाई महाले यांचा पराभव करून मिराबाई वाघेरे यांनी विजयश्री खेचून आणला. तसेच बोरवठ येथील सेनेचे पदमाकर कामडी यांना अपक्ष पंकज पाटील यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. याशिवाय करंजाळीतही सेनेचे मातब्बर नंदराम गवळी यांना दुर्गनाथ गवळी यांनी पराभूत केले. तसेच म्हसगण ग्रामपंचायतीत सुशिला अलबाड यांचा उर्मीला अलबाड यांनी पराभव केला.

दरम्यान, यावेळी निकाल ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते. तर तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नसून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १ पोलीस उपअधिक्षक, १ पोलिस निरीक्षक, १० पीएसआय , १४० पोलीस, ३८ महिला पोलिस , १४५ होमगार्ड व एसआरपी पथकाचा पोलीस (Police) बंदोबस्त होता .

तालुक्यातील सरपंचपदाचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

1. आंबे - मेघराज भागवत राऊत - राष्ट्रवादी

2. सुरगाणे - नेवाळ नामदेव - अपक्ष

3. धोंडमाळ - शिंगाडे बायजबाई मधुकर - अपक्ष

4. कोहोर - शांताबाई शांताराम चौधरी - शिवसेना

5. पाहुचीबारी - रमेश जगन्नाथ चवरे - राष्ट्रवादी

6. करंजखेड - कमलेश हनुमंत वाघमारे - अपक्ष

7. कळमबारी - विष्णू काशिनाथ मुरे - शिवसेना

8. माळेगाव - दिलीप दामू राऊत - राष्ट्रवादी

9. शिवशेत - सुनंदा येवाजी भडगे - राष्ट्रवादी

10. कोपूरली बुद्रुक - मीराबाई भाऊराव वाघेरे - राष्ट्रवादी

11. जोगमोडी - हेमराज दामू राऊत - अपक्ष

12. कापूर्णे दाभाडी - उषा पुंडलिक गवळी - अपक्ष

13. कोपूरली खुर्द - मनीषा गणपत पालवी - राष्ट्रवादी

14. हातरुंडी - शोभा गोवर्धन सातपुते - अपक्ष

15. तिरढे - सोमनाथ नामदेव नाठे - राष्ट्रवादी

16. जुनोठी - संदीप चंद्रकांत भोये - अपक्ष

17. खिरकडे - कलावती सुरेश भोये - अपक्ष

18. कायरे - प्रभावती पुंडलिक सातपुते - राष्ट्रवादी

19. दोनवाडे - सुरेश जाधव - राष्ट्रवादी

20. जळे - मनोहर लक्ष्मण चौधरी - अपक्ष

21. कुळवंडी - सुनंदाबाई हेमराज सहारे - काँग्रेस

22. उमरदहाड - जिजाबाई कुंभार - राष्ट्रवादी

23. अशोक मुकणे - बाडगी - अपक्ष

24. लिंगवणे - सोमनाथ शांताराम पोटींदे - अपक्ष

25. आड बुद्रुक - घनश्याम महाले - अपक्ष

26. भायगाव - शंकूतला मनोहर चौधरी - राष्ट्रवादी

27. हनुमानवाडी - पद्माकर पांडुरंग गायकवाड - अपक्ष

28. हनुमंतपाडा - वृषाली जनार्दन गवळी - अपक्ष

29. जांभूळमाळ - एकनाथ ढाडर - अपक्ष

30. एकदरे - गुलबा जगन सापटे - शिवसेना

31. उस्थळे - चंद्रकला चिंतामण भुसारे - राष्ट्रवादी

32. शिंदे - रोहिणी सुरेश गवळी - राष्ट्रवादी

33. करंजाळी - दुर्गनाथ नारायण गवळी - राष्ट्रवादी

34. गांगोडबारी - मोहन हिरामण गवळी - शिवसेना

35. देवगाव - यादव रावजी राऊत - अपक्ष

36. सावळघाट - मनोज हरी भोये - राष्ट्रवादी

37. बोरवट - पंकज दिलीप पाटील - अपक्ष

38. उंबरपाडा - अनिता सचिन गवळी - अपक्ष

39. कोतंबी - किरण पुंडलिक भुसारे - शिवसेना

40. उभीधोंड/मांगोने - हेमराज भगवान गवळी - अपक्ष

41. कुंभारबारी - दीपाली किरण भोये - राष्ट्रवादी

42. हरणगाव - पल्लवी विजय भरसट - अपक्ष

43. आसरबारी - गीता विशाल जाधव - काँग्रेस

44. वांगणी - मीरा संजय फुकाणे - शिवसेना

45. जांबविहीर - प्रवीण विठ्ठल गवळी - राष्ट्रवादी

46. रानविहिर - कौशल्या देवराम भुसारे - शिवसेना

47. खोकरतळे - सविता यशवंत भुसारे - शिवसेना

48. तोंडवळ - नामदेव गणपत वाघेरे - शिवसेना

49. आडगाव भु. - रेखा नेताजी गावित - माकप

50. कहाडोळपाडा - तुळशीराम विठ्ठल भांगरे - अपक्ष

51. धानपाडा - विठाबाई निवृत्ती गालट - शिवसेना

52. भुवन - विलास पांडुरंग दरोडे - अपक्ष

53. मनकापूर - भारती जगन रिंजड - अपक्ष

54. बोंडारमाळ/उमरद - रतन गंगाराम पेटार - अपक्ष

55. पिंपळवटी - राशी पंडित भांगरे - अपक्ष

56. गावंध - धनराज वसंत ठाकरे - शिवसेना

57. देवीचामाळ - नामदेव रामचंद्र गावित - अपक्ष

58. शेवखंडी - लिलाबाई मनोहर चौधरी - राष्ट्रवादी

59. शिंगदरी - तुळशीराम किसन पागी - अपक्ष

60. चोळमुख - कुसून नारायण पेटार - राष्ट्रवादी

61. घनशेत - शांता रविनाथ चौधरी - अपक्ष

62. पाटे - रुख्मिनी मधुकर गुंबाडे - शिवसेना

63. म्हसगण - उर्मिला विलास अलबाड - शिवसेना

64. कुंभाळे - मोहन भाऊराव कामडी - शिवसेना

65. गोंदे - संदीप माळगावे - राष्ट्रवादी

66. राजबारी - शाम भास्कर गावित - शिवसेना

67. डोल्हारमाळ - संगीता मनोहर बठाले - राष्ट्रवादी

68. रुईपेठ - विनायक पुंडलिक भोये - अपक्ष

69. आमलोन - वनिता देवेंद्र भोये - अपक्ष

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com