कळवण नगर पंचायत : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवारांवर दीर नितीन पवार भारी; राष्ट्रवादीला ९ जागा

कळवण नगर पंचायत : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवारांवर दीर नितीन पवार भारी; राष्ट्रवादीला ९ जागा

कळवण | प्रतिनिधी Kalwan

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार (Dr bharati pawar, union health minister for state) आणि दीर राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार (ncp mla nitin pawar) यांच्यात सरळ लढत कळवण नगरपंचायतीमध्ये होती. दोघांचीही प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली होती.

दरम्यान, १७ ही जागांचे निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने ९ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार यांची पुन्हा एकदा सरशी झाली असून कौतिक पगार यांची पुन्हा एकदा सत्ता कळवण नगर पंचायतीवर आली आहे...

राष्ट्रवादीसह कळवण नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला दोन तर कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर मनसेनेला १ जागा याठिकाणी मिळाली आहे.

वार्डनिहाय निकाल

वार्ड 1 : कौतिक पगार- 546- राष्ट्रवादी

वार्ड 2 : ताराबाई सुरेश आंबेकर- 518- शिवसेना

वार्ड 3 : मयूर बहिराम -319-काँग्रेस

वार्ड 4 : गौरव पगार - 532- राष्ट्रवादी

वार्ड 5 : राहुल पगार - 456- राष्ट्रवादी

वार्ड 6 : रोहिनी महाले -305- शिवसेना

वार्ड 7 : चेतन मैंद- 284- मनसे

वार्ड 8 : भाग्यश्री शिरोळे - 538- भाजप

वार्ड 9 : ज्योत्सना जाधव- 353- राष्ट्रवादी

वार्ड 10 : रत्ना पगार - 523- काँग्रेस

वार्ड 11 : बाळू जाधव- 331- राष्ट्रवादी

वार्ड 12 : भारती पगार - 509- भाजप

वार्ड 13 : मोतीराम पवार- 352- राष्ट्रवादी

वार्ड 14 : लता निकम - 347- राष्ट्रवादी

खालील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सुनिता कौतिक पगार - राष्ट्रवादी

तेजस पगार- काँग्रेस

हर्षदा पगार - राष्ट्रवादी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com