निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करा : छगन भुजबळ

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करा : छगन भुजबळ

नाशिक | Nashik  

आज दि. २० रोजी भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथील कार्यालयात नाशिक शहर व जिल्हा ओबीसी सेल विभागाची आढावा बैठक छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local body elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व ओबीसी (OBC) घटकांना एकत्र घेऊन ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे (Ishwar Balbuddhe) म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करत असून त्यांचे विचार देशभरात रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करा : छगन भुजबळ
निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे कडाडले

त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले पाहिजे, तसेच लवकरच तालुकावार आढावा बैठका घेतल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com