...तर खोक्यांसह 'त्यांची' तिरडी उठवणारच; नाशकात राष्ट्रवादी आक्रमक

...तर खोक्यांसह 'त्यांची' तिरडी उठवणारच; नाशकात राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले....

महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करण्याचे बाळकडू आहे. ५० खोके घेतलेले राज्याचे गद्दार जर महिलांचा अवमान करत असतील तर त्यांच्या खोक्यांसह त्यांची तिरडी या राज्यातून काढल्याशिवाय आम्ही महिला राहणार नाही, असे वक्तव्य यावेळी प्रेरणा बलकवडे यांनी केले.

...तर खोक्यांसह 'त्यांची' तिरडी उठवणारच; नाशकात राष्ट्रवादी आक्रमक
मग पाहू कोण 'गद्दार'; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला ओपन चॅलेंज

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तारांच्या फोटोला जोडे मारुन काळे फासले व प्रतिकात्मक तिरडी काढली.

...तर खोक्यांसह 'त्यांची' तिरडी उठवणारच; नाशकात राष्ट्रवादी आक्रमक
गोदावरीत बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

यावेळी संगिता झांजरे, अग्नेश गामा, राहूल कापसे, अल्का बेरड, रंजना चौधरी संगिता उमाप, विलास सहारे, राहूल जाधव, सुहास कंदारे आदिंसह असंख्य कार्यकरते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com