जिल्हाधिकारी कार्यालयात शरद पवार यांची आढावा बैठक
नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयात शरद पवार यांची आढावा बैठक

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

राज्यभरातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे बैठक सुरू आहे.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सुधीर तांबे, किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, मालेगावच्या महापौर ताहीरा शेख, माजी आमदार पंकज भुजबळ, जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,तसेच

राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्याधिकारी लीना बनसोडनाशिक परिक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग डोर्जे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला असून आढावा बैठकीला प्रारंभ झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com