गॅस सिलेंडरचे दर कमी करा; राष्ट्रवादी युवतीकडून मोदींच्या प्रतिमेचे औक्षण

न्यूज अपडेट २/News update 2
न्यूज अपडेट २/News update 2न्यूज अपडेट २/News update 2

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेलवर (Petrol-Diesel) लावण्यात आलेल्या करात कपात केली. मात्र गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही कपात न झाल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्षा सोनिया होळकर (Sonia Holkar) यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत भाऊबीजनिमित्त (Bhaubij) पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या (Prime Minister Narendra Modi) प्रतिमेचे औक्षण करत केले आंदोलन केले....

मोदी (Narendra Modi) सरकार डिझेलवर १० रुपये आणि पेट्रोलमध्ये ५ रुपये कर कपात करत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅस सिलेंडरच्या दरात कपात न केल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे.

पेट्रोल डीझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे जनता केंद्र सरकारचा विरोध करत आहे. या भीती पोटी आपण जनतेच्या बाजूने असल्याचे चित्र दाखविण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमतीत तुटपुंजी कपात केली.

गॅस सिलेंडरच्या दराकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने भाऊबीजेनिमित्त त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे औक्षण करत उपहासात्मक आंदोलन राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, ऐश्वर्या गायकवाड, दीपाली अरिंगळे, रिटा भक्कड, कल्याणी बच्छाव, काजल खैरनार, विद्या रिजल, कादंबरी वैष्णव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com