नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली

नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

जमिनीच्या सातबाऱ्यावर इतर जणांची नावे कशी आली आणि त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एकाने येथील नायब तहसीलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

तालुक्यातील हट्टी येथील भारत गुलाब पवार ही व्यक्ती अन्य दोन जणांसोबत तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास आली होती. नायब तहसीलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निवडणूक शाखेत बसून शासकीय कामकाज करीत होते.

यावेळी भारत गुलाब पवार याने सोबत आणलेला हट्टी गाव शिवारातील गट नंबर ५० चा उतारा मोरे यांना दाखविला. सदर उताऱ्यावर माझे नाव का कमी केले. तसेच उताऱ्यात इतर लोकांची नावे कशी आली. त्यावर उताऱ्यात तुझ्या वडिलांचे नाव असून त्यांच्या पश्चात तुझे नाव लागेल. त्यासाठी लेखी अर्ज कर असे सांगितले.

नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली
Ground Report : जिल्ह्यात 'या' ठिकाणी आहे 'चिंचेचे गाव'; जाणून घ्या कुठे

त्यावेळी भारत यास राग येऊन त्याने मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर भारत पवार व अन्य दोघे तहसील आवारातील तिरंगा ध्वजाखाली काही काळ ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून निघून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com