
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जनस्थानच्या पावन भूमीवर रामायणाच्या अनेक खुणा सापडतात. प्रभू रामचंद्राचा ( Loard Shri Ramchandra) सव्वादोन संवत्सर अर्थात वर्षे जनस्थान भूमीवर सहवास होता. या काळात ते ज्या ठिकाणी राहिले तेथे आजही सुबक गोपुरे उभी असून, सीतामातेचे ( Sitamata )मात्र एकमेव मंदिर जुना आडगाव नाका येथे पहायला मिळते. याच ठिकाणाहून सीतामातेचे रावणाने हरण केल्याच्या आख्यायिका आहेत म्हणूनच या ठिकाणी भाविक नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी गर्दी करतात.
जनस्थान नगरीमध्ये प्रभू रामचंद्र काळारामाच्या रूपात वास करतात. पंचवटीमध्ये त्यांचे स्थान आहे. या मंदिरापासूनच काही अंतरावर सीता गुंफा असून, जुन्या आडगाव नाक्यावरील मंदिरदेखील थोड्याच अंतरावर आहे. श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांचा रहिवास याच परिसरात ठिकठिकाणी आल्यामुळे ते ज्या ठिकाणी थांबले ते स्थळ कालांतराने मंदिरात परावर्तीत झाले. त्याच्या आख्यायिका झाल्या.
देश-विदेशातून, जगभरातून नाशिकला रोज येणार्या पर्यटक, भाविकांना या मंदिराच्या आख्यायिका रसभरीत वर्णन करून सांगण्यात येतात. त्यापैकीच एक जुन्या आडगाव नाक्याचे मंदिर असून, येथे सीतामातेची विलोभनीय मूर्ती आहे. संगमरवराची ही मूर्ती दोनही हातांची ओंजळ करून उभी आहे. नवरात्रोत्सवात भाविक येथे पवित्र स्थान असल्याने गर्दी करतात.
जुना आडगाव नाक्यावर सीतेमातेचे एकमेव असे मंदिर असून या ठिकाणाहूनच सीतामातेचे रावणाने हरण केल्याची आख्यायिका आहेत. पुराणामध्ये रामायण कथेमध्ये नाशिकच्या या स्थळाचा उल्लेख आला आहे.
- घनशाम राजहंस, पुजारी