कल्पेश कुलकर्णी ठरला 'नाट्यरसिक आयडॉल'

कल्पेश कुलकर्णी ठरला 'नाट्यरसिक आयडॉल'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाट्यकलावंतांच्या नाट्यरसिक समुहाने ‘नाट्यरसिक आयडॉल’ Natyarasik Idol ही स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कल्पेश कुलकर्णी Kalpesh Kulkarni विजेता ठरला आहे. तर प्रांजल सोनवणे व भारत मधाळे या स्पर्धकांनी अनुक्रमें दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. बेकर्स क्राफ्ट, दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक येथे अंतिम फेरी पार पडली.अंतिम फेरीसाठी अभिनेता, दिग्दर्शक सचिन शिंदे Actor, director Sachin Shinde परिक्षक म्हणून काम पाहिले.

दरम्यान अंतिम फेरीत स्पर्धकांकडून काव्यअभिवाचन, गीत गायन, मनोगत सादरीकरण अशा 3 फेर्‍यांमध्ये सादरीकरण करण्यात आले. यावेळी काव्य अभिवाचन फेरीत प्रांजल सोनवणे हिने ‘मुलगी झाली हो’ ही रविकांत शार्दुल यांची, कल्पेश कुलकर्णी याने ‘अहि-नकुल’ ही कुसुमाग्रजांची तर भारत मधाळे यांनी स्त्री ही स्वरचित कविता सादर केली.

गीत गायन फेरीत कल्पेश कुलकर्णीने अबीर गुलाल, भारत मधाळे यांनी धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना आणि प्रांजल सोनवणे हिने पल पल दिल के पास ही गीते सादर केली. मनोगत फेरीमध्ये भारत मधाळे यांनी रंगकर्मींची व्यथा मांडली

तर कल्पेश कुलकर्णी याने मोबाईलचा गैरवापर यावर तर प्रांजल सोनवणे हिने कोरोना नंतरचा शाळेचा पहिला दिवस या विषयांवर मनोगत व्यक्त केले. ‘नाट्यरसिक आयडॉल’च्या यशस्वीतेसाठी श्रीराम वाघमारे व नाटयरसिक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पुजा सोनार हिने केले.

Related Stories

No stories found.