
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे दिले जाणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाले आहेत. रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमीवर विविध माध्यमातून योगदान देणार्या कलावंतांना पुरस्कार देण्यात येणार आहेत....
यंदा अभिनयासाठी दिला जाणारा दत्ता भट स्मृती पुरस्कार सुनील ढगे, शांता जोग स्मृती पुरस्कार अनिता दाते यांना, लेखनासाठीचा नेताजी दादा भोईर पुरस्कार रविंद्र कटारे, तर दिग्दर्शनासाठीचा प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार सचिन शिंदे यांना जाहीर झाला आहे.
रविवार (दि. 5) रंगभूमी दिनानिमित कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 5:30 वाजता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री दादा भूसे आणि मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ अध्यक्ष मुंबई तथा नियामक मंडळ सदस्य, मध्यवर्ती मुंबई विजय गोखले यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश भुसारे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निश्चिती केली. दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह असे आहे.
यांना मिळणार पुरस्कार
दत्ता भट पुरस्कार (पुरस्कृत अभिनेये प्रशांत दामले) (अभिनय- पुरुष) - सुनील ढगे
शांता जोग स्मृती पुरस्कार (पुरस्कृत -डॉ .अनिरुद्ध धर्माधिकारी) (अभिनय-स्त्री) - अनिता दाते
प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार -(पुरस्कृत हेमंत टकले (दिग्दर्शन) - सचिन शिंदे
नेताजी तथा दादा भोईर पुरस्कार (पुरस्कृत सुरेश भोईर)(लेखन) - रविंद्र कटारे
पुरोहित स्मृती पुरस्कार (पुरस्कृत गिरीश सहदेव) (बालरंगभूमी) - प्रा. विजय कुमावत
जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (पुरस्कृत चारूदत्त दिक्षित) (सांस्कृतिक पत्रकारिता) - पियुष नाशिककर
डॉ. रामदास बरकले स्मृती पुरस्कार ( पुरस्कृत प्रा. हेमंत बरकले) (लोककला) - श्रीकांत गायकवाड
शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (पुरस्कृत श्रीकांत बेणी) (शाहीर पुरस्कार) - शाहीर शंकर जाधव
विजय तिडके स्मृती पुरस्कार (पुरस्कृत संकेत तिडके) (रंगकर्मी कार्यकर्ता) - राजेश जाधव
सुमन माटे स्मृती पुरस्कार (पुरस्कृत चारूदत्त दिक्षित) (पार्श्वसंगीत) - आनंद ओक.