Photo : 'हिरवा निसर्ग हा भवतीने'! वाघेरा घाटाचे निसर्गसौंदर्य

Photo : 'हिरवा निसर्ग हा भवतीने'! वाघेरा घाटाचे निसर्गसौंदर्य

नाशिक | Nashik

दाट झाडींनी आच्छादलेले डोंगर, चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि रिपरिप पाऊस व गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ व धुक्यात हरविलेल्या वाटा, असा अद्वभूत नजारा प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात हरसूल वाघेरा घाटाची (Harsul Waghera Ghat) सफर करायलाच हवी. 'हिरवा निसर्ग हा भवतीने' हे गाणे फील करायचे असेल तर हरसूल-वाघेरा घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवायलाच हवे....

वाघेरा हरसूल घाट सध्या हिरवाईने नटला आहे. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातुन पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.

नाशिकपासून (Nashik) चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हरसूल - नाशिक या मार्गावर वाघेरा घाट लागतो. उंच डोंगरमाथे आजूबाजूला दिसणारे घनदाट जंगल घाटातील नागमोडी रस्ते, वृक्षांच्या सभोवताली दिसणारी रांग, उंच, डोंगर-दऱ्या आणि पावसाळ्यातील पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यात लपलेले डोंगर आणि ऊन-सावली यांचा शिवाशिवीचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारे हे निसर्ग सौंदर्य सध्या वाघेरा घाटात आहे.

पावसाळ्यात तर येथील खळखळ आवाज करीत वाहणारे छोटे छोटे धबधबे पाहण्याची मजा काही औरच आहे. या दऱ्या खोऱ्यातून डोकवणारे हे हिरवेगार सौंदर्य पाहताक्षणी जणू काय वाघेरा घाट माथ्याने हिरवी शालच पांघरल्याचा भास डोळ्यांना होत असतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com