अग्निपथ योजना बापस लो; युवक राष्ट्रवादीची निदर्शने

अग्निपथ योजना बापस लो; युवक राष्ट्रवादीची निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकार (Central Government) लागू करत असलेल्या अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath scheme) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) व शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद चौकात निदर्शन करून अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले...

यावेळी अग्निपथ योजना बापस लो, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा केंद्र सरकार विरोधात देण्यात आल्या. भारतीय सैन्य दलात भरती होताना वयाची मर्यादा १७ ते २३ वर्ष व शिक्षणाची अट १० वी १२ वी करण्यात येऊन तरुणांची चार वर्षाकरिता सैन्य भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला असून त्यास अग्निपथ योजना (Agneepath scheme) नाव देण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर घेतले जाईल. त्यानंतर त्यापैकी २५ टक्के उमेदवार नोकरीत (Job) सेवेवर घेतले जाईल तर बहुतांश जणांची सेवा खंडित करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारे फक्त चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणे, हे अयोग्य असून केंद्र सरकार सैन्य दलात कंत्राटी भरती सुरू करत आहे.

सैन्यात भरती झालेल्या तरुणांना दोन वर्षाकरीता प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून सहा महिने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा कसा असणार हे या निर्णयातून लक्षात येते.

अग्निपथ योजनेत भाग घेणाऱ्या १०० टक्के तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून यातील २५ टक्के तरुणांची सैन्यात कायम भरती करून उर्वरित ७५ टक्के तरुणांना ४ वर्षात प्रमाणपत्र देऊन निवृत्त करणार आहे.

या निर्णयामुळे देशात बेरोजगारांची संख्या आणखी वाढणार असून हाताला काम नसल्याने प्रशिक्षण घेतलेले तरुण देश विरोधी कारवाई किंवा इतर चुकीच्या मार्गाला लागतील. अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तीव्र विरोध असून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करून सैन्यभरती पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी अशी मागणी (Demand) निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, महेश भामरे, किशोर शिरसाठ, शादाब सय्यद, योगिता पाटील, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, जय कोतवाल, गणेश पवार, सागर बेदरकर, विशाल डोके, दीपक पाटील, अमोल नाईक, किरण पानकर, नवराज रामराजे, डॉ. संदीप चव्हाण, सुनिल घुगे, जाणू नवले, अक्षय पाटील, करण आरोटे, रविंद्र शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com