राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केला विधवा प्रथा बंदीचा ठराव

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केला विधवा प्रथा बंदीचा ठराव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) 23 वा वर्धापनदिन व राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक (Nationalist Women's Congress Nashik) शहराध्यक्ष अनिता भामरे (City President Anita Bhamre) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराने विधवा प्रथा बंदीचा (Widowhood ban) ठराव केला.

विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur district) हेरवाड या गावाने विधवा प्रथांच्या निर्मूलनाचा ठराव अंमलात आणला. हेरवाड गावाचा आदर्श घेत राज्यात अनेक गावांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

विधवा झाल्यावर मंगळसूत्र न घालणे, हातातील बांगड्या फोडणे, कपाळावर कुंकू न लावणे तसेच धार्मिक कार्यक्रमात विधवांना सहभागी न करून घेणे अशा अनिष्ट प्रथा समाजात पूर्वापार चालत आल्या आहेत. या प्रथांना तिलांजली देऊन पुनश्च विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, या हेतूने राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराने (Nationalist Women's Congress Nashik City) प्रथमतः विधवा प्रथा बंदीचा ठराव केला.

सभेच्या सुरवातीलाच विधवा प्रथा बंदीचा (Widowhood ban) ठराव बैठकीत करतांना सभेचे अध्यक्षस्थान अनिता भामरे यांनी स्विकारावे,अशी सुचना कुंदा सहाणे यांनी मांडली तर अनुमोदन योगिता आहेर यांनी केले. विधवांवर होणार्‍या अन्यायाची दखल घेत ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. काही विधवा महिलांनी आपल्यावर पतीच्या निधनानंतर आलेले कटू अनुभव कथन केले.

सभा संपल्यानंतर शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी विधवा महिलांना आपल्या हाताने जोडवे घालत कपाळी कुंकू लावला. या भावनिक प्रसंगी अनेक विधवा महिलांचे डोळे पाणावले. विधवा महिलांनी जोडवे घातल्यानंतर आता खर्‍या अर्थाने पुन्हा नवीन जीवनास सुरुवात करू असे सांगत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास पूर्व विधानसभा अध्यक्ष कुंदा सहाणे, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, सातपूर विभाग अध्यक्ष अपेक्षा अहिरे, नाशिक रोड अध्यक्ष रूपाली पठारे, पंचवटी अध्यक्ष सरिता पगारे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, लता नागरे, संगिता चौधरी, हर्षदा बर्वे, कल्पना शिंदे, जिजाबाई घोडेराव, डॉ मृगाक्षी क्षीरसागर, सिम्मी राणा, मंगला मोकळ, रूपाली अहिरे, वैशाली ठाकरे, शशिकला जगताप, संध्या बोराडे, अनिता पवार, अनुसया कांबळे, अनिता मोरे, अनु राणा, रेखा चौधरी आदी महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com