भाजपची महिलांविषयी सहानुभूती म्हणजे 'पुतण्या मावशी समान'

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची टीका
भाजपची महिलांविषयी सहानुभूती म्हणजे 'पुतण्या मावशी समान'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या विरोधात भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तरुणीवर दबाव आणत बलात्काराची खोटी तक्रार पोलिसांत (Police) दाखल करण्यास प्रवृत्त केले. या घटनेतून भाजपची महिलांविषयी सहानुभूती 'पूतना मावशी समान' आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (Nationalist Women's Congress) नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे......

राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप रोजच नवनवीन गोष्टी विनाकारण घडवित आहे. एका पीडित तरूणीला शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराची खोटी तक्रार देत बळजबरीने गर्भपात केल्याचा खोटा गुन्हा पोलिसांत देण्यास प्रवृत्त केले.

मात्र पीडित तरुणीने धक्कादायक बातमी प्रसार माध्यमातून सांगत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीच जबरदस्तीने मला गोव्यात व मुंबईत डांबून ठेवले. तसेच खोटे जबाब देत रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात खोटे पत्र पोलिसांना (Police) द्यावयास सांगितले, अशी आपबिती वर्तविली.

या प्रकरणातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पीडित तरुणींची कुठलीही तक्रार नसताना केवळ महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) बदनाम करणे हा मुख्य हेतू दिसून येतो. यापूर्वीही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात पूजा चव्हाण (Pooja Chavhan) व अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांची स्विय सहायक दिशा सालियन (Disha Salian) यांची नाहक बदनामी करत राजकारणासाठी वापर केला.

खरंतर या दोघांच्या नातेवाईकांची पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्याची इच्छा नसताना भाजपच महिलांचे रक्षण करू शकतो असा आव आणत गलिच्छ राजकारण घडविले. यातून त्यांच्या कुटुंबाची किती बदनामी होत आहे याची लाज या नेत्यांना वाटली नाही.

स्व. दिशा सालियन यांच्या आईवडीलांनी तर वैतागून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना पत्र पाठवून आमच्या कुटुंबाची बदनामी नको अशी विनंती केली.

यातून भाजपला (BJP) फक्त राजकारणासाठीच महिलांचा वापर करायचा आहे त्यांची सहानुभूती पूतना मावशी समान आहे हे सिध्द होते, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.