केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मोखाडा | Mokhada

वाढती महागाई व भरमसाठ इंधन दरवाढ यामुळे राष्ट्रवादी महिला विकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात मोखाडा बस स्टँड (Mokhada bus stand) येथे आंदोलन करण्यात आले....

यावेळी विटांची चूल बनवून त्यात पारंपारिक पद्धतीने फाटे टाकून चूल पेटवण्यात आली. त्यानंतर भाकरी बनवण्यात आली. यावेळी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. वाढती महागाई, भरमसाठ वाढलेल्या गॅसच्या, पेट्रोल, डिझेलच्या किमती यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे.

त्याला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच सामान्य माणसाला हाताला रोजगार नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला विकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात बस स्टँड येथे करण्यात आले.

यावेळी उपसभापती लक्ष्मी भुसारा (Lakshmi Bhusara), महिला विकास आघाडी अध्यक्ष लता राऊत (Lata Raut) व मोखाडा शहराध्यक्षा वैशाली माळी (Vaishali Mali) यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com