राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचे नाशिक राष्ट्रवादी भवन येथील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे,समाधान जेकुरकर, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, योगेश निसाळ, अमोल नाईक,डॉ.संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, चेतन कासव, निलेश भंदूरे, चिन्मय गाढे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, स्वप्नील फुले, प्रसाद सोनवणे, नागेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी आज युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे नाशिक दौऱ्यावर आहे. या प्रसंगी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com