नाशकात राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषदचे आयोजन

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी

येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, दक्षिणाम्नाय श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्यातर्फे नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद दि.१३ जुलै रोजी गोपाल मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता होईल.

दि.१४ रोजी महापरिषदेचे उद्घाटन कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुलगुरु प्रो. डॉ. हरे राम त्रिपाठी यांच्या हस्ते होईल. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ.कूर्तकोटी सभागृहात वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार प्रदान सोहळा होईल. प्रतिष्ठानचे सचिव व प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे निमंत्रक आहेत. वैदिक संहिता,जन संज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये प्रा. हरेराम त्रिपाठी, गणेशशात्री द्रविड, वेदांतरत्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी, स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे सहभागी होतील.

ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर परिसंवादाचे संचालन करणार आहेत. दि.१४ रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडे आहेत.

यांचा होणार गौरव

राष्ट्रीय वेदशास्त्र शिरोमणी पुरस्कार वाराणसीचे गणेश्वरशास्त्री द्रविड यांना,धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार चेन्नईचे हरीहरन घनपाठी यांना, नाशिकचे वेदाचार्य श्री शांताराम भानोसे यांना यजुर्वेदासाठी, तर सामवेद पुरस्कार बंगळुरुचे मानस मिश्रा यांना व अथर्ववेद पुरस्कार जालन्याचे दिनकर जोशी यांना प्रदान करण्यात येतील. संस्कृत सेवाव्रती राष्ट्रीय पुरस्कार रामटेकचे मधुसूदन पेंना, नाशिकच्या वैशाली वैद्य यांना जाहीर झाले आहेत. वेदमूर्ती कै. नंदकुमार हरदास वेदवेदांग पुरस्कार नाशिकचे अभयशात्री पाठक व वैदिक छात्र पुरस्कार नाशिकच्याच वेदमूर्ती सौरभ पाठक यांना देण्यात येतील. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com