भारतरत्न डॉ. कलाम स्मृतीदिनी स्पर्धांचे आयोजन; 'असा' नोंदवा सहभाग

भारतरत्न डॉ. कलाम स्मृतीदिनी स्पर्धांचे आयोजन; 'असा' नोंदवा सहभाग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मोठ्या सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे (Balasaheb Sonawane) यांनी केले आहे...

स्पर्धेत किमान २५ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवणाऱ्या शाळा, विद्यालयांचा फाउंडेशनतर्फे स्वतंत्र प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

डॉ. कलाम यांच्या दि. २७ जुलैला साजऱ्या होणाऱ्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर या स्पर्धांचे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने (Online) विनामूल्य (Free Of Cost) आयोजन करण्यात आले आहे.

यात ऑनलाइन क्विज, चित्रकला व रेखांकन, वक्तृत्व, निबंध लेखन, प्रख्यात वैज्ञानिक व उद्योगपतींसोबत वेबिनार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन चॅलेंज डिझाईन कॉन्टेस्ट आदी स्पर्धा होणार आहे. यात ऑनलाइन क्वीज ही डिजिटल ऑनलाइन विक्रम प्रस्थापित करणारी स्पर्धा आहे.

स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी फाउंडेशनच्या http://apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/competition-2021 या संकेतस्थळावर भेट द्यावी. प्रत्येक स्पर्धां ह्या इ. २ री ते पदवीधर अशा विविध गटांमध्ये असून त्यानुसारच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

उपक्रमातील विविध स्पर्धांमध्ये आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग हीच कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.असे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे राज्य सचिव मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनीषा चौधरी, विभागीय समन्वयक वैशाली भामरे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे, नाशिक शहर समन्वयक दीपक पगार आदींनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com