नाशिक मनपा मुख्यालयात समूह राष्ट्रगीत गायन उत्साहात

नाशिक मनपा मुख्यालयात समूह राष्ट्रगीत गायन उत्साहात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Swatantryacha Amrut Mahotsav )नाशिक महानगरपालिकेत आज (दि. 17) मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या ( Rajiv Gandhi Bhavan )प्रांगणात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar)यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयातही सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झाला.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑगस्टपासून विविध उपक्रम मोठ्या उत्साहात झाले. आज झालेल्या कार्यक्रमात अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपायुक्त अर्चना तांबे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, उपायुक्त डॉ. विजय मुंढे, उपायुक्त करुणा डहाळे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके,

कार्यकारी अभियंता मुकुंद धर्माधिकारी, संजय अग्रवाल, गणेश मैंड, सचिन जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड, नगररचना विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर,सहाय्यक संचालक नगररचना कल्पेश पाटील,

वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे, जीव शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्रंबके, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ कल्पना कुटे, अजिता साळुंखे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परीक्षक बोधीकिरण सोनकांबळे,उपलेखा परिक्षक प्रतिभा मोरे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम,नितीन गंभीरे आदी उपस्थित होते.

शहरात सामूहिक राष्ट्रगीत गायन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यात ' स्वराज्य महोत्सव' चे आयोजन करण्यात आले आहे.स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील विविध भागांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत गायन झाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com