राष्ट्र संविधानावर चालते : गायकवाड

राष्ट्र संविधानावर चालते : गायकवाड

पिंपळगाव बसवंत । वार्ताहर | Pimpalgaon Basvant

एखादे राष्ट्र धर्माच्या नावे स्थापित होईल, होतेही परंतु देश अखंड आणि सार्वभौम राहण्याकरिता देशाला लोकव्यापी संविधान-राज्यघटना (Constitution) आवश्यक असते तेच काम भारतीय संविधानाने (Constitution of India) केले असून

राष्ट्र धर्मावर चालत नाही तर त्या देशाची राज्यघटना (कायदे-कलम) अर्थात संविधानावर चालते असे प्रतिपादन संविधान संवर्धक महेंद्र गायकवाड (Constitution Amendment Mahendra Gaikwad) यांनी केले आहे.

येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक प्रचार कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन या अभियानाचे मुख्य प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले. भारतीय संविधान निर्मिती पूर्व इतिहास-संविधान निर्माण प्रक्रिया, संविधान सभेची स्थापना, मसुदा समितीचे कार्य, भारतीय संविधानाची उद्देशिका, संविधानाने भारतीयांना काय दिले?, भारतीय संविधान संवर्धन-प्रचारक होणे व हर घर संविधान घेऊन जाण्याची गरज, संविधान संवर्धन व प्रचार-प्रसार/भारतीयांच्या जबाबदार्‍या याबद्दल सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय संविधानाप्रति आपली बांधीलकी व हक्क अधिकाराबद्दल जाणीव जागृती अधिक दृढ करण्याकरता संविधान संवर्धक (Constitutional amendment) व हर घर संविधान उपक्रमात जिल्ह्यातील संविधान प्रेमी कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्व. बी.पी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगांव बसवंतचे प्राचार्य दिनेश अनारसे अध्यक्षस्थानी होते. प्रथमेश शिंदे, वेदांत बनकर यांनी हर घर संविधान व संविधान संवर्धक कार्यशाळेचे उद्घाटन केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मामा अहिरे, दादा वानखेडे, खंडू कोतकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सिद्धार्थ पवार, कार्तिक खोडे, ओम निफाडे, राज गांगुर्डे, सुदर्शन गायकवाड, सुरज जाधव, शुभम मोगल, हर्षवर्धन संकपाळ, मानस माळी, भूषण गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, आकाश गुमणार, सुदर्शन गांगुर्डे, ऋग्वेद गवळी, यश पगार, धनंजय शिंदे, कमलेश शिंदे, संकेत जाधव, तेजस बर्डे, प्रतीक सोनवणे, संभाजी बोरगुडे, उत्कर्ष आव्हाड आदींसह संविधान संवर्धक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com