येत्या रविवारपासून नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव

येत्या रविवारपासून नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

किर्ती कला मंदिर कथक नृत्य संस्थेच्या वतीने (Kirti Kala Mandir Kathak Dance Institute) दरवर्षी ऑगस्ट महिन्यात साजरा होणारा 'नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव' (Nataraj Pandit Gopikrishna Jayanti) यंदा २९, ३०, आणि ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात दुर्वांक्षी पाटील यांच्या एकल कथक नृत्यासोबत पंडित बिरजू महाराज यांचे नातू त्रिभुवन महाराज या दोन्ही कलाकारांची नृत्यप्रस्तुती २९ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक live वर होणार आहे.

महोत्सवाचे द्वितीय पुष्प ३० ऑगस्ट रोजी, "कथक - स्वातंत्र्यानंतरचा 75 वर्षांचा प्रवास" या चर्चासत्रामध्ये नृत्यांगना विदुषी शमाताई भाटे, पंडिता उमा डोग्रा, गुरु नलिनी व गुरु कमलिनी अस्थाना, आणि गुरु रेखा नाडगौडा, आपली मतं मांडणार आहेत.

तर महोत्सवाचे शेवटचे पुष्प ३१ ऑगस्ट रोजी भरतनाट्यम गुरु, अभ्यासक आणि नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांच्या व्याख्यानासोबत नृत्याच्या प्रात्यक्षिकासह फुलणार आहे.

मागच्या वर्षी हा महोत्सव 'उम्मीद-for a better tomorrow' ही संकल्पना घेऊन ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या ऑनलाईन महोत्सवात 'डोर... Dance: the mirror of time' हा नवीन विचार मांडला जाणार आहे.

महोत्सव निःशुल्क असून सर्व सत्रात कलाप्रेमी त्याचबरोबर संगीत व नृत्य केलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावावी, असे आवाहन किर्ती कला मंदिरच्या रेखा नाडगौडा (Rekha Nadgauda) व अदिती पानसे (Aditi Panse) यांनी केले आहे.

किर्ती कला मंदिरच्या फेसबुक पेजवर हा महोत्सव Live पाहता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com