नटराज पं. गोपीकृष्ण महोत्सवास सुरुवात

नटराज पं. गोपीकृष्ण महोत्सवास सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

घुंगरुांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफातून मनोहरी दर्शन घडवणार्‍या यंदाच्या 29 व्या नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवास ( Nataraj Pt. Gopikrishna Jayanti Festival)आजपासूनकीर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींच्या नादरूप पावलांनी ‘अनलिश’ ह्या नृत्य प्रस्तुतीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

यंदाचा 29 वा नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव 20, 21, 22 ऑगस्ट रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृह, कुसुमाग्रज स्मारक आणि महाकवी कालिदास कलामंदिर अशा नाशिकमधील तीनही नाट्यगृहांमध्ये रंगत आहे.

कला साधकांचा महोत्सव म्हणजे यंदाचा ‘उडान’ करोनाच्या काळात नृत्यकलेचे शिक्षण ज्यांनी ‘ऑनलाईन’ सुरु केले आणि सुरु ठेवले त्या सगळ्या छोट्या मोठ्या कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी गणेश स्तुतीने पहिले पुष्प गुंफले. सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, दातार कॅन्सर डायग्नोस्टीकक्सच्या स्नेहा दातार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

साथसंगत सूचीत काळे, ईश्वरी दसककर यांनी दिली. सूत्रसंचालन पीयू आरोळे यांनी केले. गणेशाची विविध रुपे यावेळी उलगडून दाखवले. गुरुवंंदना अन मित्तलच्या तोडे तिर्‍हाई, तत्करने रसिकांची मने वेधली. प्रथम पुष्पाच्या उत्तरार्थात संस्थेची युवा नृत्यांगना दुर्वाक्षी पाटील हिचे एकल नृत्य झाले. अवनी अनन्या आणि सिध्दी यांनी लयबध्द पदन्यास सादर केला. भैरवीतील ठुमरीने कार्यक्रमाची सांगता झाली.

महोत्सवाचे दुसरे पुष्प रविवारी सायंकाळी पाचला कुसुमाग्रज स्मारकामध्ये ‘इंंटर्नल बॉण्ड’ गुंफले जाणार आहे. लौकीकार्थानं जीवन संपले तरी अलौकीकार्थाने पुढच्या कित्येक पिढ्यांचा प्रेरणा देणार्‍या गुरुंबद्दल ऐकायचे, पहायचे, त्यांच्या शिष्यांनी जपलेला वारसा गुरु-शिष्याचे बंध अनुभवायचे. पंडिता उमा डोंगरा, पं. दुर्गालाल यांच्या गंडाबंध शागीर्द काळाच्या पुढे जात स्वत:चे संकेत स्वत:च आकाराला आणणार्‍या प्रतिभावंत पं. दुर्गालाल यांचा नृत्यप्रवास उमाजी चित्रफितीतून उलगडणार आहेत. महोत्सवाचा समारोप सोमवार दि. 22 रोजी सायं. 5 महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये होणार आहे.

समारोपाच्या उत्तरार्धात आदिती पानसे दिग्दर्शित ‘स्पेक्ट्रम’ ही नृत्य संरचना पेश होणार आहे. कथकच्या समग्र परंपरेचा गतिशिलतेचा, रसिकांनी ह्या तीन दिवसीय नृत्य महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कीर्ती कला मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com