नाशिकच्या सत्यजितची महाराष्ट्र संघात निवड

नाशिकच्या सत्यजितची महाराष्ट्र संघात निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav)याची यंदाही 'विजय हजारे ट्रॉफी' स्पर्धेकरिता( Vijay Hajare Trophy) महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही एकदिवसीय मर्यादित 50 षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते.

आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धेबरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजित गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या 28 सामन्यांत सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे 51 बळी घेतले आहेत. भेदक गोलंदाजी बरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजित वेळोवेळी आपला वाटा उचलत असतो .

राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आयपीएल लिलावात, 20 लाख इतकी कमीत कमी बोली किंमत मिळणार्‍या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल 2022 च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स - सी एसकेतर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणून संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.

महाराष्ट्र संघाचे सामने

15 नोव्हेंबर - बंगाल , 17 नोव्हेंबर - मुंबई , 19 नोव्हेंबर - सेनादल , 21 नोव्हेंबर - मीझोराम, 23 नोव्हेंबर - पाँडेचेरी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com