करोना काळात अभ्यासक्रम रेडिओवर प्रक्षेपित; नाशिकच्या कम्युनिटी रेडिओला दोन राष्ट्रीय पुरस्कार

करोना काळात अभ्यासक्रम रेडिओवर प्रक्षेपित; नाशिकच्या कम्युनिटी रेडिओला दोन राष्ट्रीय पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी

माहिती व प्रसारण मंत्रालय, दिल्ली यांच्याकडून दिल्या जाणार्‍या राष्ट्रीय पुरस्कारात ‘रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओला दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. (Nashik's Radio Vishwas provides free audio lessons to school students amid COVID-19, bags two prizes at National Community Radio Awards) आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार-2020 ची नुकतीच घोषणा करण्यात आली. नाशिकच्या कम्युनिटी रेडीओला दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने मानाचा तुरा खोवला गेला आहे....

सस्टेन अ‍ॅबिलीटी मॉडेल पुरस्कार विभागात (Sustainability Model Awards category) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये व प्रमाणपत्र असे आहे. तर थिमॅटीक पुरस्कार विभागात (Thematic Awards category) दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 30 हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.

‘शिक्षण सर्वांसाठी’च्या 'Shikshan Sarvansathi' (Education for all) जाणिवेतून तिसरी ते दहावी मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ आणि प्रशांत पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ विश्वासवरून प्रक्षेपित करण्यात आला.

तो महाराष्ट्रातील सहा कम्युनिटी रेडिओनी प्रसारीत केला. त्यामुळे कोविड (Covid 19) काळात शिक्षणाची सोय झाली. निरपेक्ष समाजहिताच्या भावनेने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

तसेच मोस्ट इनोव्हेटिव्ह कम्युनिटी ऐंगेजमेंट पुरस्कार (Most innovative community engagement award) , प्रमोटींग लोकल कल्चर पुरस्कार (Promoting Local culture award) अशा विभागातही पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. आज भारतात ३१६ कम्युनिटी रेडिओ आहेत.

रेडिओ विश्वासचे मार्गदर्शक विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा यात समावेश आहे. स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी, रूचिता ठाकूर व रेडिओ विश्वासच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com