
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष विक्रम कदम (Vikram Kadam) यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कदम हे आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी नागपूर (Nagpur) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत...
विक्रम कदम यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला नाशिकरोड परिसरात मोठा धक्का बसला आहे. गेल्या मनपा निवडणुकीत (Municipal Elections) विक्रम कदम हे मनसेच्या तिकिटावर उभे होते त्यावेळी अतिशय थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षापासून कदम हे नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष (President of Nashik Road Division) म्हणून काम बघत होते. मात्र, त्यांनी आज अचानकपणे आपला राजीनामा दिला असून याबाबतचे पत्र त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांना पाठविले आहे.
दरम्यान, यासंदर्भात कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून आपण शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याचे सांगितले.