शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच

शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच

नाशिक। शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

संजय जामराव गढरी (रा. शिवाजीनगर, सातपूर) हे गेल्या बुधवारी (ता.27) रविवारी कारंजा येथे गेले असता, पेठे हायस्कूलसमोर पार्क केलेली त्यांची 11 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 15 सीडब्ल्यु 9648) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आधार ठाकरे (रा. सांजोरी, ता.धुळे) यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 18 एल 8245) गेल्या 23 नोव्हेंबर रोजी नेहरु गार्डनसमोरून रमाबाई आंबेडकर वसतिगृहाच्या गेटसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन अनिल थेटे (रा. बायजाबाई छावणी, रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची 20 हजार रुपये किमतीची अ‍ॅॅक्टिवा दुचाकी (एमएच 15 इडी 2939) गेल्या 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहत्या घरापासून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com