
नाशिक । प्रतिनिधी Nashik
वारसा स्थळे पुनर्बांधणीचे आश्वासन देऊन वर्ष उलटून गेले तरीसुद्धा स्मार्ट सिटी कंपनी जीर्णोद्धाराचे काम करत नाही. उलटपक्षी निषिद्ध क्षेत्रात अनावश्यक फरशा बसवत आहे. त्यामुळे कंपनीला विरोध दर्शवण्यासाठी शनिवारी (दि. 10) सकाळी 11 ला. यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट येथे जागृत नाशिककर जमणार आहेत. वारसा स्थळांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठीचा कार्यक्रम होणार आहे.
वारसा स्थळांचा हत्याकांड नाशिक स्मार्ट सिटी कंंपनीने केल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने पुरातन सांडव्यामुळे नावलौकिक असलेल्या सांडव्यावरचा सप्तशृंगी देवीचा सांडवा तोडला, छोटी मंदिरे भग्न केली. गोदा पात्रातील सुस्थितीतील 650 वर्षे जुन्या पायर्या तोडल्या. सदरहू वारसा स्थळे पुनर्बांधणीचे आश्वासन देऊन वर्ष उलटून गेले तरीसुद्धा स्मार्ट सिटी कंपनी जीर्णोद्धाराचे काम करत नाही.
उलटपक्षी निषिद्ध क्षेत्रात अनावश्यक फरशा बसवत आहे. त्यामुळे कंपनीला विरोध दर्शवण्यासाठी व वारसा स्थळांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी हे प्रतिकात्मक कार्यक्रम आहे. जागृत नाशिककर या नावाने सर्व एकत्र येणार आहेत.